कोकम सरबत | Kokum Sharbat-Kokum Sherbet recipe in Marathi | Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Drinks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
बनवन्यासाठी वेळ: २० मिनिटे
किती बनेल : २४० ml
साहित्य :
 • १ कप = १५० ग्रॅम्स कोकम/आमसुले
 • ३/४ कप = १८५ ग्रॅम्स साखर
 • १ टीस्पून वेलची पावडर
 • १ टीस्पून भाजलेली जिरे पावडर
 • मीठ चवीप्रमाणे
 • काळे मीठ चवीनुसार
 • थोडी पुदिन्याची पाने
 • पाणी
Instructions
कृती:
 1. सर्वप्रथम कोकम पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत घालावेत. १ कप कोकमांसाठी २ कप पाणी वापरावे. अर्ध्या तासाने पाणी गाळून बाजूला काढावे. हे पाणी सिरप बनवताना उपयोगी पडेल.
 2. कोकमांना हाताने चुरून बारीक बारीक तुकडे करावेत . आता सिरप बनवायला घेऊ.
 3. एका मोठ्या पॅनमध्ये कोकमचे तुकडे, साखर घालावेत. मंद आचेवर साखर विरघळू द्यावी. ४ मिनिटांत साखर विरघळते .
 4. आता जिरे पावडर , मीठ ,वेलची पावडर आणि कोकमाचे गाळलेले पाणी घालून ढवळून घ्यावे . मध्यम आचेवर हे मिश्रण शिजू द्यावे.
 5. या मिश्रणाला उकळी फुटली कि गॅस मंद करून घट्ट आणि चिकट रस होईपर्यंत शिजवावे. मधून मधून ढवळत राहावे,
 6. १५ मिनिटे या रितीने शिजवल्यानंतर कोकमाचा रस सिरप सारखा घट्ट होऊ लागतो . गॅस बंद करून सिरप थंड होऊ द्यावे . हे सिरप गाळणीने गाळून एका बाटलीत भरून घ्यावे. हे सिरप २४० ml = १६ टेबलस्पून बनते.
 7. आता कोकम सरबत बनवण्यासाठी एका जार मध्ये १ लिटर पाणी घेऊ. त्यात ४ ग्लास कोकम सरबत बनवण्यासाठी १२ टेबलस्पून = १८० ml कोकम सिरप घालू.
 8. बर्फाचे तुकडे, पुदिन्याची पाने , जिरे पावडर ,आणि काळे मीठ घालून घेऊ. नीट ढवळून घ्यावे. कोकम सरबत तयार आहे. पिण्याला देण्याआधी फ्रिजमध्ये थंड करायला ठेवावे
 9. उन्हाळयात हे घरी बनवलेले कोकमाचे सरबत नक्की करून पहा .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kokum-sharbat-recipe-in-marathi/