आंबोळी | Amboli recipe in Marathi | Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Main
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० -१२ तास
बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
किती बनतील : ८ ते १०
साहित्य:
  • १ कप = २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ ( आंबेमोहोर/इंद्रायणी घेतल्यास उत्तम )
  • १/२ कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ
  • २ टेबलस्पून = २० ग्रॅम्स चणा डाळ
  • १/४ कप = ३० ग्रॅम्स जाड पोहे
  • १ टीस्पून मीठ
  • १/४ टीस्पून मेथी दाणे
  • तेल
  • पाणी गरजेनुसार
Instructions
कृती:
  1. सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ , चणा डाळ , पोहे आणि मेथी दाणे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. नंतर तांदूळ आणि मेथीचे दाणे एकत्र पाण्यात भिजवून ठेवावेत .त्याचप्रमाणे उडीद डाळ, चणा डाळ आणि पोहे एकत्र पाण्यात भिजवावेत . हे दोन्ही किमान ६ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवावेत .
  2. त्यानंतर पाणी गाळून काढावे आणि एका मिक्सरच्या भांड्यात डाळ , तांदूळ, पोहे आणि मेथी दाणे घालून बारीक वाटून घ्यावे, पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यावे. मी ३/४ कप पाणी वापरले आहे. वाटलेले इडलीचे मिश्रण एका खोलगट भांड्यात काढावे. हात स्वच्छ धुऊन २-३ मिनिटे हे मिश्रण एकाच दिशेने गोलाकार फिरवून घ्यावे.
  3. हे पीठ सरसरीत पातळ असावे . झाकण घालून ८ ते १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवावे.
  4. ८ ते १० तासांनंतर हे पीठ चांगले फुगून वर येते . त्यात मीठ घालून हलक्या हाताने डावाने ढवळून घ्यावे.
  5. आंबोळी बनवण्यासाठी एक बिडाची काहील किंवा नॉन स्टिक तवा तापवून घ्यावा. त्यावर तेल चांगले पसरवून घ्यावे. नारळाच्या शेंडीचा किंवा कांद्याचा वापर करावा तेल पसरवून घेण्यासाठी. आच मंद ते मध्यम ठेवून २ डाव भरून इडलीचे पीठ तव्याच्या मध्यमभागी घालून गोलाकार पसरवून घ्यावे. आंबोळ्या जास्त पातळ न घालता जाडसरच बनवाव्यात . झाकण घालून २-३ मिनिटे एका बाजूने शिजून द्यावी. त्यानंन्तर झाकण काढून आंबोळी पलटवून दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावी.
  6. अशा प्रकारे साऱ्या आंबोळ्या बनवून घ्याव्यात . कोकणात या आंबोळ्या नारळाच्या किंवा कैरीच्या चटणीबरोबर , काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत आणि चिकन / मटणाच्या रस्स्यासोबत फारच छान लागतात !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/amboli-recipe-in-marathi/