कैरीचे पन्हे| Roasted Aam Panna recipe in Marathi | Kali Mirch by Smita
Author: Smita Mayekar Singh
Recipe type: Drinks
Cuisine: Indian
Ingredients
शिजवण्यासाठी वेळ : 5 मिनिटे
किती बनेल : 1 लिटर
साहित्य :
दोन मोठ्या कैऱ्या 450 ग्रॅम
पाऊण कप गूळ किसलेला
1 टी स्पून काळे मीठ
1 टी स्पून वेलची पावडर
थोडे केशराचे धागे ( आवडीप्रमाणे )
Instructions
कृती:
सर्वप्रथम आपण कैर्यांना गॅसवर जाळावर भाजून घेऊ. त्यासाठी जर तुमच्याकडे पोळी भाजण्याचा स्टॅन्ड असेल तर उत्तमच, अथवा जाळावर प्रत्यक्ष ही भाजता येतात. सुरिने कैर्यान्वर सर्व बाजूंनी उभ्या चिरा मारुन घ्याव्यात. मोठ्या आचेवर कैर्या चिमट्याच्या साहाय्याने फिरवून फिरवून चांगल्या खरपूस भाजून घ्याव्यात.
कैर्या चांगल्य पूर्णपणे थंड होऊ द्याव्यात आणि नंतरच साली काढून घ्याव्यात. चाकूने किंवा चमच्याने गर वेगळा करून घ्यावा.
भाजललेला गर मिक्सर च्या भांड्यात काढावा, त्यात गूळ घालावा. वेलची पूड, काळे मीठ आणि केशराचे धागे घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
हे झाले तयार भाजलेल्या कैरी च्या पन्ह्याचे मिश्रण! आता आपण पन्हे ढवळून घेऊ. एक मोठ्या तोंडा ची बाटली किंवा भांडे घ्यावे. मी इथे 1.25 लिटरचा काचेचा जार घेतला आहे. त्यात तळाशी थोडा बर्फ आणि पुदिन्याची पाने घालावीत . पन्ह्याचे मिश्रण वरुन घालावे. आता 1 लीटर पाणी घालून चांगले तळापर्यंत चमचा पोचेपर्यंत ढवळून घ्यावे.
प्यायला देईपर्यंत फ्रिज्मधे थंड होऊ द्यावे. याचा चटपटीत स्वाद अगदी लक्षात राहण्यासारखा आहे!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/roasted-aam-panna-in-marathi/