सर्वप्रथम आपण मालपुआचे मिश्रण बनवून घेऊ. एका मोठ्या बाउल मध्ये मैदा आणि रवा एकत्र मिसळून घेऊ. नंतर त्यात खवा हाताने कुस्करून किंवा किसून घालू . दूध घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत. मालपुआचे मिश्रण हे सरसरीत असावे , त्यासाठी आपण पाऊण कपापेक्षा थोडे जास्त दूध एकूण २२० ml वापरले आहे.
आता बडीशेप आणि वेलदोडे पावडर घालून मिसळून घेऊ. हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत साखरेचा पाक करून घेऊ.
एका पॅन मध्ये १ कप पाणी उकळत ठेऊ. त्यात साखर घालून ती मंद आचेवर विरघळू देऊ. साखर विरघळून पाक हलका चिकट झाला की त्यात केशराचे धागे घालावेत. केशराचा हलकासा रंग उतरेपर्यंत १-२ मिनिटे पाक शिजवून घेऊ. हा पाक एकतारी पाक होईपर्यंत शिजवू नये. फक्त चिकट होईपर्यंतच शिजवावा . नंतर गॅसवरून उतरवून घेऊ .साखरेचा पाक बाजूला झाकून ठेऊ.
मालपुवा तळण्यासाठी कढईत २०० ग्रॅम्स तूप तापत ठेऊ. जवळजवळ अर्धा इंच कढईत भरेल इतके तूप घालावे. मालपुवा तळण्याआधी तुपाचे तापमान तपासून पाहावे. थोडे मिश्रणाचे थेंब तुपात पाडून जर ते लगेचच पृष्टभागावर तरंगायला लागले की समजावे तूप गरम झाले आहे आणि मालपुवा तटाळण्यास काही हरकत नाही .
मिश्रण ढवळून एका डावाने तुपात अलगद सोडावे. ढवळू नये. ते आपोआप तळाशी जाऊन पसरते आणि गोल आकार घेते. कडा सोनेरी रंगावर तळून होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर तळावेत . जसे जसे मालपुवा कढईच्या तळापासून वेगळे होऊन तरंगू लागतात ते पालटून दुसऱ्या बाजूने ही तळून घ्यावेत ( तळण्यासाठी लागणारा वेळ : ३ मिनिटे )
एवढ्या मिश्रणात ८ ते १० मालपुवा बनतात . थोडा वेळ त्यांना किचन टिश्यू पेपर वर काढून घ्यावेत. नंतर त्यांना साखरेच्या पाकात २ मिनिटे बुडवून ठेवावेत. लक्षात असू द्या साखरेचा पाक हलका गरम असावा , फार जास्त गरम किंवा थंड असू नये नाहीतर मालपुवा पाक शोषून घेत नाहीत.
हे मालपुवा थंडगार रबडीसोबत किंवा असे नुसते खायला सुद्धा फार छान लागतात !
टीप: मालपुवा मंद आचेवर तळल्याने ते कडांना कुरकुरीत आणि मध्यभागी नरम राहतात आणि खायला फार मजेदार !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/malpua-recipe-in-marathi/