मायक्रोवेव पावभाजी| Microwave Pav Bhaji recipe in Marathi
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ: १० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ: ३० मिनिटे
कितीजणांसाठी पुरेल : ३-४
साहित्य:
लागणाऱ्या भाज्या ( आपल्या आवडीनुसार ):
 • १ कप= १२५ ग्रॅम्स फुलकोबी
 • २ मध्यम आकाराचे बटाटे - साली काढून तुकडे करून =१५० ग्रॅम्स
 • १/४ कप = ४० ग्रॅम्स ताजे किंवा फ्रोझन मटारचे दाणे
 • १/४ कप= ४० ग्रॅम्स गाजर बारीक तुकडे करून
 • १/४ कप=४० ग्रॅम्स भोपळी मिरची बारीक चिरून
इतर साहित्य:
 • १ मोठा कांदा बारीक चिरून = १०० ग्रॅम्स
 • २ मोठे टोमॅटो बारीक चिरून = २०० ग्रॅम्स
 • १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
 • २ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
 • १/४ टीस्पून हळद
 • १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
 • २ टेबलस्पून पाव भाजी मसाला
 • मीठ चवीप्रमाणे
 • बटर
 • तेल
नोट: माझ्या मायक्रोवेव्ह ओव्हनची उच्चतम् म्हणजे हाय पॉवर ९०० वॅट इतकी आहे . जर तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन माझ्या इतक्या पॉवरचा असेल तर तुम्ही ह्या पाककृतीत दिलेल्या वेळा जशाच्या तशा पाळू शकता. जर तुमचा ओव्हन ९०० वॅट पेक्षा जास्त किंवा कमी पॉवर चा असेल तर खालील दिलेला पॉवर कॉन्व्हर्जन चार्ट वापरून वेळ कमी जास्त करू शकता!
 • https://microwavemasterchef.com/microwave-power-time-conversion/
Instructions
कृती:
 1. सर्वप्रथम आपण भाज्या शिजवून घेऊ . एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये फुलकोबी, गाजर, बटाटे,मटार, भोपळी मिरची , १ १/२ कप पाणी आणि थोडे मीठ घालून एकत्र मिसळून घेऊ.
मोड: मायक्रो
पॉवर: हाय ( ९०० वॅट )
वेळ: १२ मिनिटे
स्टार्टचे बटण दाबून झाकण न घालता भाज्या १२ मिनिटे शिजवून घेऊ.
 1. १२ मिनिटांचा टाइमर संपल्यावर हातात ग्लोव्हस घालूनच बाऊल ओव्हनच्या बाहेर काढून घेऊ. शिजलेल्या भाज्या चाळणीतून वेगळ्या करून पाणी दुसऱ्या बाउल मध्ये काढून घेऊ. ह्या पाण्याचा उपयोग नंतर भाजी शिजवताना करता येईल तर ते फेकून देऊ नये.
 2. शिजलेल्या भाज्या एका पोटॅटो मॅशर ने छान लगदा करून घेऊ. किंवा तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता.
 3. मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये १ टेबलस्पून बटर आणि १ १/२ टेबलस्पून तेल घालून गरम करून घेऊ.
मोड: मायक्रो
पॉवर: हाय ( ९०० वॅट )
वेळ: ३० सेकंद
झाकण न घालता स्टार्टचे बटण दाबू.
 1. बटर विरघळले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून नीट बटर आणि तेलात चमच्याने ढवळून घेऊ.
मोड : मायक्रो
पॉवर: हाय (९०० वॅट )
वेळ: ४ मिनिटे
झाकण न घालता स्टार्टचे बटण दाबू
 1. ४ मिनिटांत कांदा छान परतला की त्यात आले लसणाची पेस्ट घालून मिसळावी.
मोड: मायक्रो
पॉवर: हाय ( ९०० वॅट )
वेळ: ३ मिनिटे
झाकण न घालता स्टार्टचे बटण दाबू .
 1. ३ मिनिटांनंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून शिजवून घेऊ.
मोड: मायक्रो
पॉवर: हाय ( ९०० वॅट )
वेळ: ४ मिनिटे
झाकण घालून स्टार्टचे बटण दाबू.
 1. टोमॅटो शिजून नरम होतात. आता आपण सारे कोरडे मसाले म्हणजे हळद, काश्मिरी लाल मिरची पूड, पावभाजी मसाला घालून घेऊ. थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घेऊ. मसाले ढवळत असतानांच टोमॅटो चमच्याने दाबून मॅश करून घ्यावेत जेणेकरून त्यांचा लगदा होईल.
मोड: मायक्रो
पॉवर: हाय ( ९०० वॅट )
वेळ: २ मिनिटे
झाकण न घालता स्टार्टचे बटण दाबू.
 1. आता वेळ आहे छानपैकी थोडे बटर घालून मॅश केलेल्या भाज्या घालायची! भाज्या शिजताना उरलेले पाणी आपण आता घालणार आहोत. जितकी पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल तेवढे पाणी घालू. मी १ १/२ कप पाणी वापरले आहे.
मोड: मायक्रो
पॉवर: हाय ( ९०० वॅट )
वेळ: ७ मिनिटे
झाकण घालून स्टार्टचे बटण दाबू.
 1. ४ मिनिटांनंतर टाइमर पॉज करून भाजी एकदा वरखाली ढवळून घेऊ. बाऊल परत ओव्हन मध्ये ठेवून उरलेल्या ३ मिनिटांसाठी भाजी शिजवून घेऊ.
 2. ३ मिनिटांनंतर भाजी शिजून तयार आहे.
 3. पाव शेकून घेऊ. तुम्ही गॅसवर तव्यावरही शेकू शकता किंवा जर तुमच्याकडे ओव्हन सेफ नॉनस्टिक तवा असेल तर त्यावर थोडे बटर चोपडून आणि थोडी भाजी घालून घ्यावी. त्यावर पाव ठेवावेत.
मोड : ग्रिल ( तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये असल्यास )
वेळ: २ मिनिटे
स्टार्ट
 1. गरम गरम लुसलुशीत पावाबरोबर ही मायक्रोवेव्ह पाव भाजी खाऊन बघाच ! काहीतरी वेगळे करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे नेहेमीच शक्य नसतो हो !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/microwave-pav-bhaji-in-marathi/