१/२ टीस्पून खाण्याचा सोडा ( किंवा १ टीस्पून फ्रुट सॉल्ट / इनो )
२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
मीठ
Instructions
कृती:
सर्वप्रथम ओट्सना एका पॅन मध्ये भाजून घेऊ. ३ मिनिटे मध्यम आचेवर ओट्स भाजले कि त्यांचा रंग छान खरपूस करडा होतो. एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावेत.
आता रवा भाजून घेऊ. बारीक आगीवर नीट लक्ष देऊन रवा खरपूस भाजावा . एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावा.
आता आपण भाज्या शिजवून घेऊ. पॅनमध्ये १ १/२ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. मोहरी, उडीद डाळ ,आणि चण्याची डाळ घालून तडतडू द्यावी. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आले घालून परतावे . ३० सेकण्ड परतल्यानंतर मटारचे दाणे, फरसबी आणि गाजर घालून मिसळून घ्यावे. मीठही घालावे. झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
३ मिनिटांत भाज्या बऱ्यापैकी शिजतात, या उप्पर त्या इडलीसमवेत वाफेवर अजून शिजणार आहेत. कोथिंबीर घालून, ढवळून गॅस वरून उतरवावे.
ओट्स थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची एकदम बारीक पावडर करून घेऊ. आता आपण इडलीचे मिश्रण बनवायला घेऊ. एका मोठ्या बाऊल मध्ये रवा, ओट्सची पावडर मिसळून घेऊ. शिजलेल्या भाज्या घालू . दही घालून ढवळून घेऊ. चवीपुरते मीठ घालू. आता मिश्रण चमच्यातून पडेल इतके पातळ होईपर्यंत पाणी घालू. जास्त घट्ट वा पातळ करू नये.
जवळजवळ अर्धा कप पाणी मी वापरले आहे. आता खाण्याचा सोडा घालून मिश्रण एकाच दिशेने ढवळून घेऊ. हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवावे.
१५ मिनिटांनंतर इडल्या वाफवण्यासाठी स्टिमर मध्ये पाणी उकळावयास ठेवू. इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावून त्यात इडलीचे मिश्रण घालून घेऊ.
मंद ते मध्यम आचेवर झाकण घालून इडल्या १५ मिनिटे वाफवून घेऊ. स्टिमर मधून काढून जरा थंड झाल्यावर सुरीने काढून घेऊ.
इतक्या साहित्यात १२-१५ इडल्या बनतात . नारळाची चटणी , टोमॅटोची चटणी किंवा ब्रेकफास्ट सांबार सोबत खायला द्याव्यात. चटणी आणि सांबाराची रेसिपीस आमच्या हिंदी चॅनेल व इंग्रजी वेबसाइट वर उपलब्ध आहेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/oats-idli-recipe-in-marathi/