Spanish Omelette recipe in Marathi| स्पॅनिश ऑम्लेट
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : 15 मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : 35 मिनिटे
किती जणांना पुरेल : 4 ते 5
साहित्य:
  • 6 अंडी
  • 1 मोठा कांदा– 100 ग्रॅम्स
  • 5 मोठे बटाटे -450 ग्रॅम्स
  • ½ टीस्पून सफेद मिरी पावडर किंवा काळी मिरी पावडर
  • मीठ चवीप्रमाणे
  • ½ कप तेल -125 ग्रॅम्स ( एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओईल असेल तर नक्की वापरावे )
Instructions
कृती:
  1. सर्वप्रथम कांदा लांब पातळ चिरून घ्यावा. बटाट्यांच्या साली काढून , धुवून पातळ एक सारख्या फोडी करून घ्याव्यात.
  2. ऑमेलेट्ट बनवण्यासाठी आपल्याला एका खोलगट आणि पसरट पॅन ची गरज आहे. सपाट तवा घेऊ नये. पॅन मध्ये तेल घालून घेऊ . तेल तापले की कांदा आणि बटाटे घालून एकत्र मध्यम आचेवर परतून घेऊ.
  3. मिनिटे परतल्यानंतर आच मंद ठेवून हे मिश्रण शिजू देऊ . मिश्रण शिजताना पॅन च्या तळाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी.
  4. जवळजवळ 20 मिनिटे आपण हे मिश्रण शिजवले आहे. बटाटे अगदी नरम होतात तेव्हा आपण गॅस बंद करू आणि ह्यातले जादा तेल वेगळे एका वाटीत गाळुन घेऊ. ह्याच तेलात आपण ऑमेलेट्ट शिजवणर आहोत.
  5. कांदा आणि बटाट्याचे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ. यातच अंडी फोडून घालावीत. सफेद मिरी पावडर आणि मीठ घालून घ्यावे. हे मिश्रण फोर्क किंवा चमच्याने फक्त मिसळून घ्यावे, खूप जास्त ढवळू नये. जर या मिश्रणात तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची , कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हे अंड्याचे मिश्र्ण 10 मिनिटे झाकून ठेवावे.
  6. मिनिटनी आपण ऑमेलेट्ट बनवायला घेऊ. मिश्र्ण थोडे घट्ट होते . पॅनमधे 2-3 टेबलस्पून तेल घालून घेऊ. आच मंद ठेवून आपण मिश्रण पॅन मधे घालू आणि 1 मिनिट मोठ्या आचेवर शिजू देऊ.
  7. ऑमेलेट्ट जरा सेट झाले की आच मंद करून 2-3 मिनिटे शिजू देऊ.
  8. मिनिटांनंतर फोर्क ने ऑमेलेट्ट चेक करून पहावे, जर ते पॅन सोडत असेल तर गॅस बंद करावा. पण वर एक मोठी प्लॅट उपदी ठेवावाई आणि पॅन मधील ऑमेलेट्ट प्लेट मधे काढून घ्यावे. ही कृती करताना अजिबात घाई करू नये, सावकाश ऑमेलेट्ट प्लेट मधे उपडे करावे.
  9. आता आपण ऑमेलेट्ट ला दुसर्या बाजूने ही शिजवून घेऊ. ऑमेलेट्ट हळूहळू पॅन मधे परत सरकवावे आणि गॅस सुरू करावा. मंद आचेवर दुसर्या बाजूने ही 2- 3 मिनिटे शिजू द्यावे.
  10. मिनिटे शिजल्यानंतर परत गॅस बंद करावा आणि ऑमेलेट्ट वर सांगितलेल्या पद्धतीनेच प्लेट मधे उपडे करून घ्यावे. परत पॅन मधे सरकवून 2 मिनिटांसाठी शिजू द्यावे.
  11. ऑमेलेट्ट तयार झाले आहे , गरम गरम वाढावे. हे ऑमेलेट्ट थंड झाले तरी चविष्ट लागते हीच याची खासियत आहे.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/spanish-omelette-recipe-marathi/