४ ताजे लहान आकाराचे मुळे = ७०० ग्रॅम्स , साली काढून स्वच्छ धुऊन
मुळ्याचा ताजा पाला =२५० ग्रॅम्स , धुऊन कोवळ्या देठांसकट पाने वेगळी करावीत
२ मोठे कांदे = १५० ग्रॅम्स लांब चिरून
१/२ कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
१/४ कप = ५० ग्रॅम्स चणा डाळ - धुऊन १ तास पाण्यात भिजवून
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
५-६ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
१ टीस्पून हळद
मीठ
तेल
Instructions
कृती :
सर्वप्रथम मुळे आणि पाला बारीक चिरून घ्यावा. भाजी चिरल्यानंतर ती एका चाळणीत काढून घ्यावी जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. भाजीत पाणी राहिल्यास अति शिजून भाजीला उग्र दर्प येतो.
कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . तेल तापले कि त्यात लसूण मिरचीची फोडणी करावी. लसूण गुलाबी रंगावर परतला गेला कि चिरलेला कांदा घालून चांगला पारदर्शक होईपर्यत मध्यम आचेवर परतावा.
चण्याची डाळ घालावी . मंद आचेवर कांद्यासोबत जरा परतून थोडे मीठ घालावे. झाकण घालून शिजू द्यावे.
३ मिनिटे आपण चण्याची डाळ शिजू दिली आहे , आता हळद घालून १ मिनिट परतून घेऊ.
चिरलेली भाजी घालून एकत्र मिसळून घेऊ. झाकण घालून पाणी अजिबात न घालता मंद आचेवर शिजू देऊ..
१२ मिनिटे भाजी शिजवून घेतली आहे . मुळा आणि चण्याची डाळ चांगली शिजून नरम झाली आहे. आता चविनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे.
किसलेला ओला नारळ घालून भाजी छान एकत्र करून घ्यावी. नारळाची गोडसर चव भाजीत खूप छान लागते . गॅसवरून उतरवून गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत वाढावी. भातात मिसळून खायला तर एकदम चविष्ट लागते. डब्यासाठी उत्तम !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/mulyachi-bhaji-recipe-in-marathi/