सर्वप्रथम करंजीच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊ. एका परातीत गव्हाचे पीठ, रवा आणि मीठ मिसळून घेऊ. आता १/४ कप = ६० ml कोमट तेल पिठात मोहन घालून घेऊ. ३०० ग्राम पिठासाठी आपण ६० ml तेलाचे मोहन घातले आहे. पीठ आणि तेल यांचे ५:१ हे प्रमाण लक्षात ठेवावे. पिठात तेल चांगले रगडून घ्यावे. ब्रेड क्रम्ब्स सारखे पीठ दिसायला हवे. १ कप पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्यावे. पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून १५ मिनिटे झाकून ठेवावे.
आता करंजीचे सारण बनवून घेऊ. मटारचे दाणे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर फिरवून घ्यावेत. एकाच दक्षता घ्यावी कि पूर्ण बारीक करू नयेत आणि जाड दाणे देखील ठेवू नयेत जेणेकरून करंज्या तेलात फुटू नयेत.
हिरव्या मिरच्या, आले, आणि लसणाची पाणी न घालता जाडसर पेस्ट वाटून घ्यावी.
कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. जिऱ्याची फोडणी घालून बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. लसूण आणि कांदा आवडत नसल्यास नाही घातले तरी चालेल.
हळद घालून ३० सेकण्ड परतून घ्यावी. आले-लसूण-मिरच्यांची वाटलेली पेस्ट घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावी.
मटारची पेस्ट मध्यम आचेवर ६ मिनिटे परतून घेतली आहे . तिचा कच्चेपणा निघून गेल्यावर आणि ती थोडी कोरडी होऊ लागल्यावर त्यात सारे मसाले घालून घेऊ- धणे पावडर, बडीशेप पावडर, तीळ, आणि खसखस घालून घेऊ. नीट एकत्र मिसळून घेऊ.
आता साखर, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे मिश्रण १ ते २ मिनिटे शिजवून घेऊ. ओले खोबरे आणि लिंबाचा रस घालून ढवळून घेऊ. मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ .
मटारची पेस्ट मध्यम आचेवर ६ मिनिटे परतून घेतली आहे . तिचा कच्चेपणा निघून गेल्यावर आणि ती थोडी कोरडी होऊ लागल्यावर त्यात सारे मसाले घालून घेऊ- धणे पावडर, बडीशेप पावडर, तीळ, आणि खसखस घालून घेऊ. नीट एकत्र मिसळून घेऊ.
आता साखर, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे मिश्रण १ ते २ मिनिटे शिजवून घेऊ. ओले खोबरे आणि लिंबाचा रस घालून ढवळून घेऊ. मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ .
करंजीचे सारण आणि आवरणाचे पीठ तयार आहे. पीठाचे आपण छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ. एकेक गोळा तेल लावून पुरीच्या आकारात पातळ लाटून घेऊ. लाटताना पीठ अजिबात लावू नये.
लाटलेल्या पारीवर मध्यभागी १-२ टेबलस्पून सारण घालू. सारण फार जास्त आणि फार कमीही असू नये. पारीच्या कडांना पाणी लावून घेऊ. अर्धचंद्राच्या आकारात करंजी बंद करून घेऊ. करंजीसाठी तुम्ही साचाही वापरू शकता . करंजीच्या कडा बंद करताना पीळ घालून बंद कराव्यात जेणेकरून सारण बाहेर पडणार नाही! अशा प्रकारे साऱ्या करंज्या बनवून घेऊ.
करंज्या तळण्यासाठी कढईत करंज्या बुडतील इतके तेल घालून तापवून घ्यावे. तेल चांगले गरम झाले कि आच मंद ते मध्यम ठेवून करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
गरमागरम करंज्या टोमॅटो केचप सोबत खाण्यास उत्तम लागतात .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/matar-karanji-recipe-in-marathi/