Masale Bhat recipe in Marathi| मसाले भात
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : ५0 मिनिटे
किती जणांना पुरेल : 3 ते 4
साहित्य :
  • 2 कप लांब दाण्यांचा बासमती तांदूळ
  • ½ कप ताज्या मटारचे दाणे
  • 1 मध्यम आकाराचा बटाटा - फोडी करून
  • 1 कप फूलकोबी
  • 1 कप तोंडली - लांब ४ तुकडे करून
  • 7-8 लवंग
  • 1 इंच दालचिनीचा तुकडा
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टेबलस्पून धणे
  • 1 मोठा कांदा पातळ लांब चिरून
  • 2 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
  • 1 टीस्पून मोहरी
  • ½ टीस्पून हिंग
  • 1 टीस्पून हळद
  • 2 टीस्पून लाल मिरची पूड
  • 3 टीस्पून गोडा मसाला
  • 2 तमालपत्र
  • 10-12 काजू
  • ½ कप खोवलेला ओला नारळ
  • तेल
  • मीठ
  • 1 टेबलस्पून साजूक तूप
Instructions
कृती:
  1. बासमती तांदूळ ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा.
  2. एका पॅन मध्ये धणे , जिरे , दालचिनी, आणि लवंग एकेक करून भाजून घ्यावे. जोपर्यंत मसाल्याचा खमंग सुवास येत नाही तोपर्यंतच ते भाजून घ्यावेत. थंड झाले कि त्यांची बारीक पावडर करून घ्यावी.
  3. एका कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. त्यात सर्वप्रथम काजू तळून घ्यावेत. काजू हलक्या करड्या रंगावर तळून झाले कि एका ताटलीत काढून घ्यावेत.
  4. त्याच तेलात तमालपत्र, मोहरी व हिंगाची फोडणी दयावी. चिरलेला कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतावा. आता आले लसणाची पेस्ट घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावा.
  5. आता हळद, लाल मिरची पूड, गोडा मसाला , भाजलेल्या मसाल्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे. हे सगळे मिसळून मंद आचेवर ४ मिनिटे परतून घ्यावा.
  6. आता भाज्या घालून घ्याव्यात. फूल कोबी, मटार, तोंडली, बटाट्याच्या फोडी आणि १ कप पाणी घालून मिक्स करून घ्यावे. झाकण घालून मंद आचेवर भाज्या शिजू द्याव्यात.
  7. १२-१३ मिनिटांत भाज्या शिजतात. आता भिजवलेले तांदूळ पाणी काढून कढईत घालावेत. तळलेले काजू घालून साडेचार कप पाणी घालून घ्यावे ( २ कप तांदळांसाठी ). मध्यम आचेवर एक उकळी फुटू द्यावी.
  8. उकळी फुटल्यानंतर आच मंद करून भातात १ टेबलस्पून तूप घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे. झाकण घालून मंद आचेवर मसालेभात शिजू शिजू द्यावा.
  9. १५ मिनिटे मंद आचेवर भात पूर्णपणे शिजतो . गॅस बंद करून मसालेभात वाढेपर्यंत झाकूनच ठेवावा . महाराष्ट्रीयन दह्याची किंवा ताकाच्या कढीबरोबर मसालेभात अप्रतिम लागतो !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/masale-bhat-recipe-in-marathi/