Takachi Kadhi recipe in Marathi| ताकाची कढी
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : 10 मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : 15 मिनिटे
किती जणांना पुरेल : 3 ते 4
साहित्य:
नोट : 1 कप = 200 ml
  • 1. 1½ कप दही - 300 ग्रॅम
  • 2. 3 हिरव्या मिरच्या
  • 3. 10-12 कढीपत्ता
  • 4. पाणी गरजेनुसार
  • 5. 1 इंच आल्याचा तुकडा
  • 6. 7-8 लसणीच्या पाकळ्या
  • 7. 1 ½ टेबल स्पून बेसन ( चण्याचे पीठ )
  • 8. ½ टी स्पून मोहरी
  • 9. ½ टी स्पून जीरे
  • 10. ¼ टी स्पून हिंग
  • 11. 3 लसणीच्या पाकळ्या चेचून
  • 12. 1 टी स्पून हळद
  • 13. 2 टी स्पून साखर
  • 14. 2 टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरून
  • 15. मीठ
  • 16. तूप 1-2 टेबल्स्पून
Instructions
कृती:
  1. • सर्वप्रथम एका खलबत्त्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या पाणी न घालता कुटून त्याचा ठेचा करून घेणे. जर मिक्सर वापरायचा असेल तर पाणी न घालता वाटून घ्यावे.
  2. • आता ताक घुसळून घेऊ. एका खोलगट भांड्यात दही घालून रवीने चांगले फेटून घ्यावे जेणे करून त्यात गूठळी राहणार नाही. दही फेटल्यावर त्यात 1 ते 1.5 कप पाणी घालून परत रवीने घुसळून घ्यावे. चांगला फेस येईपर्यंत ताक घुसळावे.
  3. • दुसर्या वाडग्यात बेसन आणि 2-3 टेबल्स्पून पाणी घालून चांगले फेटावे. हे मिश्रण अगदी एकसंध असावे त्यात बेसनाची गूठळी असू नये. हे बेसनाचे मिश्रण ताकात घालून नीट हलवुन घ्यावे. असे केल्याने बेसनाच्या ताकात गूठल्या पडत नाहीत.
  4. • आता हळद, साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून ताक ढवळून घ्यावे.
  5. • आता कढी च्या फोडणीसाठी कढईत 1-2 टेबल्स्पून तूप घालून घेऊ.
  6. • तूप गरम झाले की त्यात मोहरी, जीरे, हिंग आणि लसूण चेचून घालावी. कढीपत्ता घालावा.
  7. • लसूण गुलाबी रंगावर होत आली की त्यात वाटलेला मसाला घालावा. मध्यम आचेवर आले लसणाचा कच्चे पणा निघून जाईपर्यंत परतावा.
  8. • जवळ जवळ 2 मिनिटे लागतात मसाला परतून घ्यायला. आता ताकाचे मिश्रण घालून घेऊ , त्या आधी गॅस मंद करून मगच त्यात मिश्रण घालावे.
  9. • मंद ते मध्यम आचेवरच कढी शिजू द्यावी. मोठ्या आगीवर कढी ला लगेच उकळी येऊन कधी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ताक वेगळे आणि मसाला वेगळा असे होऊ शकते. म्हणून कढी बारीक आगीवरच शिजू द्यावी आणि सतत ढवळत राहावी.
  10. • मंद आचेवर कढी शिजायला जवळ जवळ 12 मिनिटे लागतात. वरुन कोथिंबीर भूरभुरावी आणि गॅस बंद करून कढी झाकून ठेवावी.
  11. • ही कढी हलकी थंड झाल्यावरच गरमागरम भाता सोबत वाढावी . सोबत एखादा पापड भाजून किंवा तळणी च्या कोरड्या मिरच्या नक्की वाढाव्या. अगदी ब्रह्मानंदी टाळी लागलीच समजा!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/takachi-kadhi-recipe-in-marathi/