Hurda Bhaji in Marathi| हुरडा भजी
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : 15 मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : 15 मिनिटे
कितीजणांना पुरेल : 4-5
साहित्य :
 • १/२ कप ज्वारीचा हुरडा
 • १ १/२ इंच आले किसलेले
 • ५-६ लसूण किसलेले
 • ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
 • १/४ कप कोथिंबीर बारीक चिरलेली
 • १/४ टीस्पून हळद
 • १ टेबलस्पून पांढरे तीळ
 • मीठ
 • १/२ कप बेसन / चण्याचे पीठ
 • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
 • तळण्यासाठी तेल
Instructions
कृती:
 1. एका मोठ्या बाऊल मध्ये हुरडा , किसलेले आले , किसलेले लसूण, बारीक चिरलेल्या मिरच्या , कोथिंबीर, हळद, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, बेसन , तांदळाचे पीठ आणि १ टेबलस्पून गरम तेल , एकत्र मिसळून घेऊ. अतिशय थोडे पाणी घालून भज्यांचे पीठ घट्ट भिजवून घेऊ.
 2. भजी तळण्यासाठी कढईत तेल घालून गरम करून घ्यावे. तेल चांगले गरम झाले की आच मध्यम करून एका चमच्याने भज्यांच्या पीठाचे छोटे गोळे तेलात सोडून देऊ. बारीक ते मध्यम आचेवर भजी खरपूस तळून घेऊ.
 3. हे भजी नुसतेही खायला चांगले लागतात. आवडत असल्यास चिंचेच्या गोड़ चटनी किंवा टोमॅटो केचप सोबत खायला द्यावेत.
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/hurda-bhaji-in-marathi/