Hurda Bhel recipe in Marathi| हुरडा भेळ
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : १० मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : १० मिनिटे
कितीजणांना पुरेल : ३-४
साहित्य :
  • 250 ग्रॅम्स हुर्डा
  • 1 मोठा कांदा बारीक चिरून
  • 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून
  • 1½ टेबलस्पून लसूण खोबरे चटणी किंवा चवीप्रमाणे
  • 1½ टेबलस्पून शेंगदाण्याची चटणी किंवा चवीप्रमाणे
  • 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
  • मीठ चवीप्रमाणे
  • शेव आवडीप्रमाणे
  • तिळगुळाच्या रेवड्या आवडीप्रमाणे
Instructions
कृती :
  1. एक लोखंडी तवा मोठया आचेवर तापवून घ्यावा . नॉनस्टिक तव्याचा वापर केला तरी चालेल! आच मध्यम ठेवून थोडा थोडा हुरडा चांगला भाजून घ्यावा. हुरडा भाजताना त्याचा रंग बदलणार नाही याची दक्षता घ्यावी, नाहीतर त्याचा रसाळपणा कमी होऊन तो चिवट लागतो.
  2. भाजलेला हुरडा एका मोठ्या पसरट भांड्यात घेऊन त्यात लसूण खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी घालावी. त्यातच चिरलेला कांदा , टोमॅटो, लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे.
  3. हुरड्याची भेळ तयार आहे , खायला देताना भरपूर कुरकुरीत शेव आणि सोबत रेवड्या द्यायला विसरू नका !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/hurda-bhel-recipe-in-marathi/