Kandyachya Paticha Pithla| कांद्याच्या पातीचे पिठले
Author: 
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : 15 मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : 15 मिनिटे
कितीजणांना पुरेल : 4-5
साहित्य :
 • कांद्याची पात एक जुडी - धुऊन आणि बारीक चिरून - ४०० ग्रॅम्स
 • 8-10 लसणीच्या पाकळ्या
 • 7-8 हिरव्या मिरच्या
 • 1 कप बेसन – 125 ग्रॅम्स
 • ½ टीस्पून मोहरी
 • ½ टीस्पून जिरे
 • ½ टीस्पून ओवा
 • ¼ टीस्पून हिंग
 • 1 टीस्पून हळद
 • 2 टीस्पून लाल मिरची पूड ( तिखट ) - जास्त तिखट आवडत नसल्यास काश्मिरी मिरची पूड वापरावी
 • 3 टेबलस्पून तेल
 • मीठ चवीप्रमाणे
Instructions
कृती:
 1. एका भांड्यात चण्याचे पीठ /बेसन घालून त्यात १ कप पाणी घालून फेटून घ्यावे.
 2. लसूण आणि मिरच्यांची एका खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरला लावून जाडसर पेस्ट वाटून घ्यावी.
 3. एका कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात मोहरी, जिरे , हींग आणि ओव्याची फोडणी द्यावी.
 4. आता लसूण मिरचीचा जाडसर खर्डा घालून तो परतून घ्यावा. चांगला २-३ मिनिटे परतावा जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल.
 5. हळद घालून एक मिनिटभर परतावी. आता लाल मिरची पूड आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घ्यावी. मध्यम आचेवर २-३ मिनिटे परतून घ्यावी.
 6. कांद्याची पात पाणी सॊडायला सुरवात करते. आता बेसन घालून ढवळून घेऊ. ३-४ कप पाणी घालून पिठले हवे तितके पातळ करून घेऊ. मीठ घालून एक उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर शिजू देऊ.
 7. पिठल्याला उकळी फुटली की गॅस कमी करून कढईवर झाकण घालून पिठले शिजू देऊ.
 8. जवळजवळ १२ मिनिटांमध्ये पिठले शिजून तयार होते, वरचेवर पिठले हलवायला विसरू नये, नाहीतर कढईच्या तळाशी चिकटू शकते.
 9. हे पिठले गरमागरम ज्वारीच्या /बाजरीच्या भाकरीसोबत किंवा वाफाळलेल्या ऊन ऊन भातासोबत भन्नाट लागते !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/kandyachya-patichapithla-marathi/