2-3 टेबल स्पून बेसन ( फक्त शाकाहारी पॅनकेक्स साठी )
Instructions
किसणीच्या साहाय्याने बटाटे किसून घ्यावे , शक्यतो मध्यम आकाराच्या किसणीच्या दातांनी बटाटे किसावेत. आणि हे किसलेले बटाटे बर्फ घातलेल्या थंड पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे बटाटे काळे पडत नाहीत आणि बटाट्यांचा स्टार्चही धूऊन निघतो. 5 मिनिटांसाठी बटाटे असेच पाण्यात ठेवावेत.
मिनिटांनंतर बटाटे पाण्यातून काढून चाळणीत निथळत ठेवावे. एक्सट्रा स्टार्च निघून गेल्याने पॅनकेक्स चिकट न होता एकदम कुरकुरीत होतात.
आता आपण पॅनकेकचे मिश्रण बनवून घेऊ ज्यात आपण अंड वापरणार आहोत. एका मोठ्या खोलगट भांड्यात किसलेले बटाटे घालून घेऊ. त्यातच चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या , चिरलेली कोथिंबीर, मैदा, चवीप्रमाणे मीठ आणि 1 अंड फोडून घालू आणि एकत्र मिसळून घेऊ.
हे मिश्रण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू आणि शाकाहारी पॅनकेक साठी मिश्रण बनवून घेऊ. त्यासाठी दूसरया भांड्यात किसलेले बटाटे , चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर , मैदा , मीठ आणि अंड्याऐवजी यात आपण 3 टेबलस्पून बेसन घालून एकत्र मिसळून घेऊ. शाकाहारी पॅनकेक्स चे मिश्रण तयार आहे आणि आपण ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. तोपर्यंत अंडे घातलेल्या मिश्रणाचे पॅनकेक्स तव्यावर घालून घेऊ.
एका नॉनस्टिक तव्यात 1 टेबल स्पून तेल गरम करून घेऊ. तेल तापले की आच मंद करावी आणि त्यात 1-2 चमचे मिश्रण घालू. हे मिश्रण चमच्याने दाबून एक सारखे करून घ्यावे . मंद आचेवर चांगले शिजू द्यावे.
एका बाजूने पॅनकेक आपण दीड मिनिट शिजवून घेतले आहे. जशा पॅनकेक्स च्या कडा खरपूस रंगावर आल्या की पॅनकेक उलटून घेऊ. दूसर्या बाजूने ही खरपूस भाजून घेऊ.
अशाच प्रकारे शाकाहारी पॅनकेक्सही बनवून घेऊ.
या मापा मधे 6 ते 8 पॅनकेक्स बनतात. मिश्रण आदल्या दिवशी बनवून फ्रीज मधे ठेवले तर सकाळच्या घाईत पटकन होतात हे पॅनकेक्स!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/potato-pancake-in-marathi/