Bharli Vangi-भरली वांगी
Author: 
Prep time: 
Cook time: 
Total time: 
Serves: 3-4
 
Ingredients
  • 8 लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी (250 ग्रॅम )
  • 3 टेबलस्पून शेंगदाणे
  • 2 टेबल स्पून पांढरे तीळ
  • 2 टीस्पून जीरे
  • 1 कप किसलेले सुके खोबरे ( 100 ग्रॅम )
  • 3 मध्यम आकाराचे कांदे ( 150 ग्रॅम )
  • 1 लहान आकाराचा टोमॅटो ( 70 ग्रॅम )
  • 10-12 लसूण पाकळ्या
  • 1-1.5 इंच आल्याचा तुकडा
  • ¼ कप कोथिंबीर
  • ½ टीस्पून हळद
  • 2 टीस्पून लाल मिरची पूड
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून धणे पावडर
  • तेल
  • मीठ चवीनुसार
Instructions
  1. सर्वप्रथम वांगी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत वांग्याचे देठ न कापता त्यांना तळापासून देठापर्यंत दोन उभ्या चिरा मारून घ्याव्यात जेणेकरून आपण त्यात मसाला भरू शकू. वांगी नंतर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावीत नाहीतर ती काळी पडतात.
  2. आता मसाल्याची तयारी करून घेऊया एक कढई मध्यम आचेवर तापवून घ्यावी त्यात शेंगदाणे घालून खरपूस भाजावेत . शेंगदाणे चांगले भाजले की एका ताटात काढून घ्यावेत.
  3. त्याच कढईत पांढरे तीळ भाजून घ्यावेत . तीळ करड्या रंगावर भाजून झाले की ताटात काढून घ्यावेत. नंतर जिरे घालावे आणि चांगले खमंग होइपर्यन्त भाजावे. अशाच प्रकारे सुके खोबरे भाजून घ्यावे आणि ताटात काढून घ्यावे .हे मिश्रण पूर्ण थंड होऊ देणे.
  4. वर कोरड्या भाजलेल्या साहित्यात आले, लसूण आणि अर्धा चिरलेला कांदा मिसळावा .बाकीचा अर्धा कांदा फोडणीसाठी राखून ठेवावा .अगदी थोडं पाणी वापरून या मिश्रणाचा घट्ट गोळा वाटावा. मात्र बारीक वाटावे जास्त जाडसर असू नये .मसाला वाटताना पाणी जास्त झाले तर मसाला पातळ होऊन वांग्यात भरला जाणार नाही. हे वाटण वाटताना मी जवळजवळ अर्धा कप पाणी वापरले.
  5. आता या मसाल्याच्या गोळ्यात सारे कोरडे मसाले जसे की हळद, लाल मिरचीची पूड , धणे पावडर , गरम मसाला आणि मीठ घालून घ्यावे . वांग्यात भरण्यासाठी हा मसाला तयार झाला
  6. वांगी मिठाच्या पाण्यातून काढून त्यात हा मसाला दाबून भरावा .उरलेला मसाला आपण भाजीत वापरणार आहोत .
  7. कढईत दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम होऊ द्यावे, तेल गरम झाले की त्यात उरलेला चिरलेला कांदा घालावा आणि चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा .कांदा परतून झाला त्यात वांगी घालून मध्यम आचेवर दोन-तीन मिनिटं परतून घ्यावी .वांगी हलवत राहावीत नाहीतर एका बाजूने करपू शकतात.
  8. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि उरलेल्या मसाल्याची गोळी घालावी, छान एकत्र मिसळून घ्यावे. नंतर वांगी शिजण्यासाठी त्यात जवळजवळ दीड ते दोन कप गरम पाणी घालावे
  9. गॅस मंद करून ,झाकण घालून पंधरा ते वीस मिनिटं शिजू द्यावे . वांगी शिजली की गरमागरम पोळी ,फुलका किंवा भाकरी सोबत वाढावीत. अप्रतिम लागतात!
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/bharli-vangi-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80/